लोकसत्ता टीम

अकोला : आंध्र प्रदेश येथील चक्रीवादळ ‘मिचौंग’चा रेल्वेला देखील फटका बसत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनकडून काही प्रवासी रेल्वे गाडी रद्द करण्यात येत आहे. यामध्ये भुसावळ विभागातील नवजीवन एक्सप्रेस रेल्वेगाडीचा समावेश आहे. तीन दिवस नवजीवन एक्सप्रेस धावणार नाही.

way for expansion of Borivali-Virar transport has been cleared
बोरिवली-विरार वाहतूक विस्ताराचा मार्ग मोकळा
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Heavy rains in Gujarat many trains cancelled
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रेल्वेगाड्या…
Mumbai - Ayodhya Special Train, Ayodhya Train,
मुंबई – अयोध्या विशेष रेल्वेगाडी
Central Railway disrupted due to technical glitch
Mumbai Local : तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
Kharkopar to Uran railway line, Cleaners employment,
स्थानक सफाईवरून रेल्वे-सिडको यांच्यात टोलवाटोलवी, सफाई कामगार रोजगाराच्या प्रतीक्षेत
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी
railway block news, railway, Sunday block,
मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक

आणखी वाचा-मध्य प्रदेशातील भाजप विजयात अकोल्याचा वाटा, जाणून घ्या सविस्तर…

आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. रेल्वेने अनेक प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामध्ये भुसावळ विभागातून धावणारी नवजीवन एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. गाडी क्रमांक १२६५६ चेन्नई – अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस ०३ ते ०५ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १२६५५ अहमदाबाद – चेन्नई नवजीवन एक्सप्रेस ०४ ते ०६ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. या गाडीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची ऐनवेळी चांगलीच अडचण होणार आहे.