नागपूर : बंगालच्या उपसागराच्या उत्तर क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र व चक्रीवादळ तयार झाले असले तरी महाराष्ट्राच्या दिशेने ते येण्याची शक्यता नाही. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अवकाळी पावसाचीही शक्यता नाही, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दक्षिण भारतातील तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागात ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत ईशान्य मान्सून कार्यरत असतो. यावर्षी तो सरासरीइतकाच होईल, असा अंदाज आहे.
हेही वाचा : “दीक्षाभूमीवर हार व फूल नको, वही-पेन आणा”, का केले गेले असे आवाहन? वाचा…
या मान्सूनचा प्रभाव आणि चक्रीवादळ यामुळे महाराष्ट्रात एखादेवेळी अवकाळी पाऊस होतो. मात्र, यावर्षी त्याची शक्यता फारच कमी आहे. दक्षिणेत तो सामान्य राहील, असा अंदाज आहे. सध्या अरबी समुद्रात केरळ राज्यातील कोचीन-अलेप्पी अक्षवृत्तादरम्यान लक्षद्वीप बेटांच्याही पश्चिमेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे २६ ऑक्टोबरनंतर चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. ते ओमानच्या दिशेने जाणार असून महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही.