नागपूर : “मिचॉंग” चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात आणि विशेषकरून विदर्भात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. येत्या ४८ तासात राज्यासह देशाच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह विदर्भात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात डिसेंबरपर्यंत राज्यातील बऱ्याच भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर नऊ डिसेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नांदेड, सोलापूर, उस्मानााद, अहमदनगर, लातूर भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पाच ते नऊ डिसेंबर दरम्यान पुढील पाच दिवस पावसाची शक्यता असून पाच ते सात डिसेंबरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील. तर आठ ते नऊ डिसेंबरला हवामान कोरडं राहण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर पुढील ७२ तासांमध्ये राज्याच्या काही भागात हिवाळ्याची पकड पाहायला मिळेल असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.