वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टॉप गियरवर आला आहे. बड्या नेत्यांची सभा लागत असल्याने उदासीन दिसणारा ग्रामीण भाग सहभागी होत भाषणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. आर्वीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे विरुद्ध खासदार पत्नी मयूरा अमर काळे, असा सामना रंगात आला आहे. दोन्ही उमेदवार तोडीस तोड म्हणून चर्चा पण झडत आहेत. काही वाक्ये तर मतदार डायलॉग म्हणून वापरू लागले आहेत. आर्वीतील एका सभेत दादाराव केचे म्हणाले की, मी १९८२ पासून घराणेशाही विरोधात लढत आहे. स्वातंत्र्यास ७५ वर्ष, त्यापैकी ६५ वर्ष काँग्रेस व त्यातील ४० वर्षे आर्वीत काळे कुटुंब. मात्र इतक्या वर्षात आर्वीसाठी काय केले ते सांगत नाही आणि पुढे काय करणार हे पण विरोधी उमेदवार बोलत नाही, असा टोला त्यांनी अमर काळे यांना लगावला. सांगण्यासारखे एक काम दाखवावे, असेही आवाहन त्यांनी विरोधकांना दिले. आणि टाळ्यांचा गडगडाट झाला.

खासदार पत्नी रिंगणात असल्याने सुमित वानखेडे यांच्या अर्धांगिनी अँड. क्षितिजा काळे या पण प्रचारार्थ रिंगणात उतरल्या आहेत. मुंबईत प्रसिद्ध वकिली फर्म स्वबळावर नावारूपास आणणाऱ्या अँड. क्षितिजा यांनीही विरोधकांवार तोफ डागली. संविधानास धोका असल्याचा खोटा प्रचार करतात. पण आता खरा धोका कुटुंबाच्या सत्तेपुढे उभा झाला आहे. ४० वर्षात जी कामे झाली नाही ती आता चार वर्षात आर्वीत झाली. खरं नसेल तर खोडून काढा, असे आव्हान त्यांनी दिले. पुढे त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेता कसा असावा ते सांगून ठेवले आहे. नेता दूरदृष्टी, सामर्थ्य, धैर्य, करुणा असणारा असावा, असे डॉ. आंबेडकर म्हणत. हे सर्व गुण सुमित वानखेडे यांच्यात असल्याची पावती अँड. क्षितिजा वानखेडे यांनी दिली.

sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
ankita prabhu walavalkar Pushpa 2 review
“प्लीज, तुमचे पैसा वाया घालवू नका”, कोकण हार्टेड गर्लचे ‘पुष्पा 2’ बद्दल स्पष्ट मत; म्हणाली, “जे चित्रपट…”
Comedian Sunil Pal reveals kidnapping ordeal
“डोळ्यावर पट्टी बांधून एका घरात नेलं अन्…”, कॉमेडियन सुनील पालने सांगितला अपहरणाचा घटनाक्रम; म्हणाला, “२० लाख रुपये…”
Devendra Fadnavis Friend told his Memories
Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस साधे सरळ राजकारणी, कुणाला पाडा, कुणाला खेचा हे..”; जिवलग मित्राने उलगडला स्वभाव

हेही वाचा…महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

u

सुधीर दिवे म्हणाले की, काँग्रेवाल्यांचे दादाराव केचेंविषयी प्रेम आता जास्तच उफाळून आले आहे. त्यांची प्रशंसा ते सभेतून करीत आहेत. मात्र दादाराव यांचा सन्मान करण्यासाठी भाजप समर्थ आहे. येथे कुणीही तिकीट मागू शकतो आणि एकाला मिळाली की मग सर्व कामाला लागतात. नाराज नं होता कामाला लागणे ही भाजपची संस्कृती. एवढ्या वर्षांत काय केले ते सांगत नाही. आम्ही काय केले ते जनतेस दिसत आहे, अशी टिपणी दिवे यांनी केली.

Story img Loader