वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टॉप गियरवर आला आहे. बड्या नेत्यांची सभा लागत असल्याने उदासीन दिसणारा ग्रामीण भाग सहभागी होत भाषणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे. आर्वीत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सुमित वानखेडे विरुद्ध खासदार पत्नी मयूरा अमर काळे, असा सामना रंगात आला आहे. दोन्ही उमेदवार तोडीस तोड म्हणून चर्चा पण झडत आहेत. काही वाक्ये तर मतदार डायलॉग म्हणून वापरू लागले आहेत. आर्वीतील एका सभेत दादाराव केचे म्हणाले की, मी १९८२ पासून घराणेशाही विरोधात लढत आहे. स्वातंत्र्यास ७५ वर्ष, त्यापैकी ६५ वर्ष काँग्रेस व त्यातील ४० वर्षे आर्वीत काळे कुटुंब. मात्र इतक्या वर्षात आर्वीसाठी काय केले ते सांगत नाही आणि पुढे काय करणार हे पण विरोधी उमेदवार बोलत नाही, असा टोला त्यांनी अमर काळे यांना लगावला. सांगण्यासारखे एक काम दाखवावे, असेही आवाहन त्यांनी विरोधकांना दिले. आणि टाळ्यांचा गडगडाट झाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा