अमरावती : Amravati Dahi Handi 2023 श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीला दहीहंडीचा उत्‍सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्‍यात येत असताना अमरावतीत मात्र राजकीय पक्षांच्‍या सहभागामुळे हा जल्‍लोष आठवडाभर चालत असल्‍याचे गेल्‍या काही वर्षांतील चित्र आहे. यंदाही युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे येत्‍या १० सप्‍टेंबरला तर शिवसेनेच्‍या शिंदे गटातर्फे १२ सप्‍टेंबर रोजी दहीहंडी उत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी सिनेसृष्‍टीतील कलावंताची हजेरी हे नेहमीप्रमाणे वैशिष्‍ट्य आहेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येत्‍या १० सप्‍टेंबरला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षातर्फे नवाथे चौकात दहीहंडीचे आयोजन करण्‍यात आले असून चित्रपट अभिनेते संजय दत्‍त, अर्शद वारसी, चंकी पांडे, राजपाल यादव, तुषार कपूर, अभिनेत्री शिल्‍पा शेट्टी, अमिषा पटेल, अमृता खानविलकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. दहीहंडीची उंची ४० फुटांच्‍या वर राहणार आहे.

हेही वाचा >>> VIDEO: दहीहंडी उत्सवाला गालबोट! गॅलरी कोसळून मुलीचा मृत्यू, एक गंभीर

१२ सप्‍टेंबरला संत गाडगेबाबा समाधी मंदिराच्‍या समोरील प्रांगणात शिवसेनेच्‍या शिंदे गटातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी अभिनेत्री प्राजक्‍ता माळी प्रामुख्‍याने उपस्थित राहणार आहे. जन्‍माष्‍टमीनंतर दुसऱ्या दिवशी बहुतांश चित्रपट कलावंत हे मुंबईत दहीहंडी उत्‍सवात व्‍यस्‍त असतात, त्‍यामुळे नंतरच्‍या काही दिवसांत या कलावंताना अमरावतीत आमंत्रित करण्‍याचा मध्‍यममार्ग काढून दहीहंडी उत्‍सव साजरा करण्‍याची परंपरा गेल्‍या काही वर्षांत रुजल्‍याचे जाणकार सांगतात.