नागपूर: अधिवेशन काळात विधी मंडळ परिसरातील फूड स्टॉलची रोज अन्न व औषधी विभागाकडून  दररोज तपासणी केली जाणार  आहे. सर्व मंत्री ,आमदार , विधान भवन परिसरात राहणाऱ्या लोकांच्या चांगल्या प्रकृतीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अण्णा व औषधी विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशन निमित्ताने ते नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.अनेक हॉटेल अस्वच्छ ठेवतात .त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. विधिमंडळ परिसरात संत्रा ज्यूस तपासणी होणार. शिवाय टॉयलेटंमध्ये चहापाण्याची अनेक जण भांडे धुतात. त्यामुळे अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधीमंडळातील परिसरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय आमचे जिथे आहे तिथे आमचाच ताबा असणार आहे.अधिवेशनात विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार, शेतकरी आणि राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला न्याय देणार आहे.अनिल देशमुख यांचे दिवस संपले त्यांची ही अखेरची निवडणूक आहे. त्यांचे राजकारण आता संपले, शरद पवार देव माणूस आहे. त्यांच्या बाबतीत बोलणार नाही असेही आत्राम म्हणाले.

हेही वाचा >>>‘शासन आपल्या दारी’ ही तर सरकारची फसवेगिरी… जयंत पाटील यांचा आरोप

शरद पवार गटाचे आमदार कार्यालयात आले तर आम्ही सोबत बसू. शरद पवार गटाचे आमदार आमच्या कडे येतील. ४५ आमदार आमचे होईल. काहींना यायला वेळ लागत आहे.मुंबईला वानखेडे मध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेईल हा निवडणुकीचा नंतरचा भाग आहे. जे सक्षम असेल त्या परिस्थितीनुसार निर्णय होईल. आम्हाला देखील वाटत अजित पवार मुख्यमंत्री व्हावे असेही आत्राम म्हणाले