बुलढाणा : धरणग्रस्त पेनटाकळी गावाचे स्थलांतरण नियमानुसार व्हावे आणि ३८० प्लॉटचे वितरण करण्यात यावे या मागणीकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने  गावातील महिलांनी रौद्र रूप धारण केले! त्यांनी पेन टाकळी धरणाच्या पाण्यात उतरून  बेमुदत उपोषण सुरु केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी गावातील रहिवासीयांनी  ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना  निवेदन दिले होते.पेन टाकळी येथील गावठाणचे स्थलांतर योग्य पद्धतीने करण्याकरिता सात दिवसांच्या अवधी देण्यात आला होता. मात्र  जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेरीस आजपासून गावकर्यांनी पेनटाकळी जलाशयात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.   सुमन लहाने,शांता मते, भागु अंभोरे, मंगला इंगळे,शोभा मगर,जयश्री राऊत,संगीता मोरे, द्वारका वाघ, कुसुम मगर,मंदा इंगळे,मंदा  वाघ, द्रौपदी  काकडे, सुनंदा निकम, कौशल्या धंदरे, मयुरा गायकवाड, सरस्वती इंगळे, मणकर्णा इंगळे,केशर इंगळे, शांता इंगळे,अनुराधा डुकरे,शितल इंगळे, दुर्गा अंभोरे, दीक्षा वानखेडे,अलका गवई, सुशीला वानखेडे, लता वानखेडे,ज्योती वानखेडे,रमा वानखेडे, उषा गवई, मीना वानखेडे, वैशाली वानखेडे,रत्नमाला वानखेडे,नर्मदा वानखेडे, गुंफा वानखेडे, अन्नपूर्णा वानखेडे,सीमा वानखेडे,शीला खरात, निर्मला गायकवाड, कांता कांबळे,मीरा राजेकर,मनीषा काकडे, लक्ष्मी काकडे,गीता काकडे इत्यादी महिलानि आंदोलनास्त्र उगारले! त्यांच्या समवेत मधुकर खरात, शत्रुघ्न वानखेडे, मधुकर इंगळे,दीपक काकडे,भगवान वानखेडे, रामदास वानखेडे,संजय वानखेडे,बाळू वानखेडे, गजानन वानखेडे,प्रकाश कांबळे,जगदीश इंगळे, परसराम इंगळे,गजानन वाघ,आनंद वानखेडे, दत्तात्रय इंगळे,दगडू गवई, संतोष खरात,अमोल डुकरे,सदाशिव काकडे, दत्तात्रय धोंडगे,सुरेश इंगळे,पुरुषोत्तम माळेकर, शिवाजी वानखेडे, पुंजाजी इंगळे,शंकर इंगळे,मंगेश इंगळे, विश्वास इंगळे,किसन मोरे,भागवत जाधव, गजानन इंगळे,त्र्यंबक इंगळे,सर्जेराव इंगळे, गुलाब इंगळे,संतोष डुकरे,भीमराव वानखेडे, भीमराव काकडे,अक्षय इंगळे, संजय अंभोरे,रवींद्र इंगळे,धोंडीराम ठोंबरे, वैभव इंगळे,गोपाल इंगळे,पंजाब इंगळे,पुंडलिक खरात,परमेश्वर वानखेडे, प्रवीण इंगळे,शिवप्रसाद जाधव,केशव इंगळे, पंढरी इंगळे,मधुकर धोंडगे,तेजराव राजेकर, अशोक सुरवसे,जयराम केवट,नारायण जाधव, महादू वानखेडे,विजय मते,विकास गायकवाड, किसन इंगळे,हे देखील आंदोलनात सहभागी झाले आहे.

काय आहे समस्या?

मौजे पेनटाकळी येथे तब्बल ३८० घरांचे स्थलांतर करणे क्रम प्राप्त आहे. मात्र हे करताना यंत्रणा मनमानी करीत आहे. यामुळे जिल्हाधिकारी वा मेहकर एसडीओ यांनी स्थलांतराची कार्यवाही करावी अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे. भूमी अभिलेख आणि नगर रचना विभागाच्या कारवाईनंतर दोनशे एकोनपन्नास प्लॉट काढण्यात आले. मात्र तीनशे ऐंशी प्लॉट आवश्यक असल्याने गावकर्यांनी स्थलंतर ला विरोध केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam affected pentakali village on indefinite hunger strike for relocation scm 61 amy