बुलढाणा : मागील जुलै महिन्यात जिल्ह्यातील पाच तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. हानीची व्याप्ती इतकी भीषण होती की याचे सर्वेक्षण करायला महिना लागला! जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांनी नुकसानीचा हा अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. शासनाकडे १६१ कोटींची मदत मागण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही केवळ कृषी नुकसानीची आकडेवारी आहे. मालमत्ता व अन्य नुकसानीचा यात समावेश नाही. यामुळे नुकसानीची व्याप्ती किती भीषण आहे हे स्पष्ट होते. मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव या पाच तालुक्यांचा हा अहवाल आहे. तब्बल ३४१ गावांतील ९८०५ शेतकऱ्यांची ४२०५ हेक्टर सुपीक शेतजमीन कायमची निकामी झाली! दरड कोसळणे, जमीन खरडणे, महापुरामुळे नदीपात्र बदलणे यामुळे दहा हजार शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन कायमचे हिरावले गेले. बाधित शेतकऱ्यांना ४७ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे १९.७६ कोटींची मदत मिळणार आहे.

हेही वाचा – जुन्या पेन्शनचा मुद्दा पुन्हा पेटणार? राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या पुस्तिकेत संकेत

शेतीत तीन इंचापेक्षा जास्त थर

दुसरीकडे १९ हजार ५४३ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर वाळू, गाळाचे ३ इंचापेक्षा जास्त थर जमा झाले आहे. ८६६६ हेक्टर जमिनीला याचा फटका बसला. यापोटी शासनाकडे १६ कोटींची मदत मागण्यात आली आहे. एकूण १२ हजार ८७१ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ३५.३६ कोटींची मदत आवश्यक आहे.

हेही वाचा – ‘जनसंवाद यात्रे’चे अधिकृत पोस्टर रिलिज, पदाधिकाऱ्यांना लावता येणार स्वत:चा फोटो

दीड लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

अतिवृष्टी व महापूर यामुळे तब्बल दीड लाख हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान झाल्याचे हा अहवाल सांगतो. तब्बल १ लाख ५६ हजार २०६ शेतकऱ्यांना हा फटका बसला. यातही हे आकडे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचे आहे. जिरायत क्षेत्राचे बाधित क्षेत्र १४ हजार ५८१ हेक्टर, बागायतचे ४५३ तर फळबाग क्षेत्र ४२७ हेक्टर इतके आहे. यामुळे पाच तालुक्यांतील खरीप हंगाम जवळपास उद्ध्वस्त झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage due to heavy rain in buldhana district damage to kharif crops on one and a half lakh hectares scm 61 ssb
Show comments