बुलढाणा : एका वाढदिवसाच्या ‘पार्टी’त यूपी बिहार स्टाईलमध्ये हाती बंदूक घेऊन नाचणाऱ्या व्यक्तीविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. २६ एप्रिल रोजी सोशल मीडियावर हा ‘डान्स’ वेगाने सार्वत्रिक झाला आणि प्रचंड गाजला.
संजय बलासे ( २९, राहणार देऊळगाव साकरशा, तालुका मेहकर) असे आरोपीचे नाव आहे. याच गावातील आशिष ढव्हळे (२६) याच्या ‘बर्थडे पार्टी’त वेगळ्याच धुंदीत असलेल्या बलासे याने इतरांसह बेफाम नृत्य केले. याचा ‘व्हिडीओ’ २६ एप्रिलला वेगाने व्हायरल झाला. याची गंभीर दखल घेत प्रभारी पोलीस अधीक्षक अशोक थोरात, मेहकरचे उपविभागीय अधिकारी विलास यामावार यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यावरून जानेफळ पोलीस ठाण्याचे प्रल्हाद टकले यांनी तक्रार दिली. यावरून आरोपी संजय बलासे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार टकले, गणेश शिंदे, विनोद फुफाटे करीत आहे.