लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याची आजची सकाळ दरोडा आणि त्यात एका महिलेचा ठार झाल्याच्या बातमीनेच उजाडली! मोताळा तालुक्यात हा भीषण आणि अभूतपूर्व घटनाक्रम घडला असून मोताळा तालुक्यासह बुलढाणा जिल्हा अक्षरशः हादरला असून यालाजिल्हा पोलीस दल सुद्धा अपवाद ठरले नाहीये!

दरम्यान रविवारी, एकोणवीस जानेवारी सकाळपासूनच दाभाडी या गावाला लष्करी छावनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध शाखाचे प्रमुख, श्वान पथक, हस्त मुद्रा तज्ज्ञ दाभाडी या छोटेखांनी गावात तळ ठोकून आहे. जिल्ह्यात सर्वत्र नका बंदी करण्यात आली असून शेजारील जिल्ह्यातील पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. या खळबळजनक घटनेचा विस्तृत तपशील मिळू शकला नाही. विविध सूत्रांकडून प्राप्त प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे.

आणखी वाचा-पीएफ हस्तांतरण प्रक्रिया सुलभ, कर्मचाऱ्यांना काय होणार फायदा?

मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे हा दरोडा पडला आहे. लूट मार करताना, संभवता प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनीकोणतीही दयामाया न दाखविता एका महिलेचा जीव घेतला. दाभाडीच्या एसटी बस थांब्या जवळ दाताळा मार्गांवर पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी काल आज रविवारी उत्तरंरात्री हा दरोडा पडला. त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे यांचा या दरोड्यामध्ये जीव गेला आहे. घरात पती-पत्नी दोघेच होते. दहाव्या वर्गात शिकणारी मुलगी सहलीनिमित्त बाहेर गावी गेलेली होती. सकाळी चार ते पाच पाच वाजता सदर दरोडा पडल्याची प्रथमदर्षांनी आढळून आले आहे.

सुसज्ज दरोदेखोरांच्या टोळीने या जोडप्यास बेशुद्ध करण्यासाठी गुंगीच्या औषधचा वापर केला असावा असा अंदाज आहे. यामुळे डॉक्टर गजानन टेकाळे हे बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आले . त्यांच्या पत्नी माधुरी टेकाळे गतप्राण झाल्याचे पोलिसांना आढळून आले. मृतक माधुरी टेकाळे यांचा चेहरा पूर्णपणे काळा पडला होता. दरोडेखोरांनी बेडरूम मध्ये असलेले कपाटे तोडून दागिने आणि कॅश चोरून नेले असल्याचा अंदाज आहे. झटापटी दरम्यान दरोडेखोरांनी माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला , असा संशय आहे. डॉक्टर गजानन टेकाळे अत्यवस्थ असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्याही मेंदूवर मार बसल्याचे समजते.

आणखी वाचा-देशात चार वर्षांत सायबर गुन्हेगारीत पाचपट वाढ, २९ हजार बँक खात्यातून १,४५७ कोटी रुपये लंपास

दरम्यान घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी दाभाडी कडे धाव घेतली . सदर घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी बी महामुनी, अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, मलकांपूर शहर, ग्रामीण यासह अन्य ठाणेदार देखील दाभाडी मध्ये दाखल झाले