लोकसत्ता टीम
वर्धा : रागाच्या भरात किंवा वचपा काढायचा म्हणून कोण कसा वागेल याचा नेम नाही. यात मग विकृती पण प्रकटते. झाले असे की हिंगणघाट येथील शंकर महादेव खिरडकर यांच्या मुलाचे व सूनेचे पटत नाही म्हणून ते विभक्त राहतात.
आणखी वाचा-धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमी सज्ज
घटनेच्या दिवशी खिरडकर हे आपल्या पत्नीसह वरोरा येथे एका कार्यक्रमास संतकृपा नगरातील घरास कुलूप लावून गेले होते. तेव्हा त्यांना मुलगा अजय याने फोन करीत घटना सांगितले की सून रंजना हिने घराच्या दारावर अश्लील फोटो चिकटवले. तसे फोटो माझ्या वॉट्स ऍप वर पाठविले आहे. माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार केल्याचा संशय मुलाने व्यक्त केला. हे ऐकून खिरडकर यांनी लगेच हिंगणघाट गाठले. घराची पाहणी केल्यावर त्यांना हे फोटो दिसून आले. तसेच घराच्या खिडकीच्या काचा फुटल्याचे आढळले. त्यांनी लगेच पोलीसांकडे तक्रार दाखल केली.