लोकसत्ता टीम

नागपूर : मुलाचे थाटामाटात लग्न करून दिल्यानंतर नवीन नवरी सून घरात आली. मॉर्डन असलेल्या सुनेला राजा-राणीच्या संसारात सासू-सासरे खुपायला लागले. त्यामुळे लग्नाच्या काही दिवसानंतरच सून ही सासू-सासऱ्यांना टोमणे मारायला लागली. पत्नीचा विचित्र स्वभाव बघून पती तिची समजूत घालत होता. मात्र, यात पती-पत्नीचे भांडण व्हायला लागले. ही बाब आईवडिलांना कळली. कुटुंबाचा ऱ्हास होताना बघता आईवडिलांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दोन्ही पक्षाला बोलावत त्यांची समजूत काढल्यानंतर स्वतंत्र राहण्याचा सुवर्णमध्य काढला आणि तक्रार निकाली निघाली.

Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
supreme court ask government for treatment of bedridden youth
तरुणाच्या कुटुंबीयांसाठी सर्वोच्च न्यायालय मदतीला; अकरा वर्षांपासून अंथरुणाशी खिळलेल्या तरुणावर आता सरकारी उपचार
Laxman Dhoble is in the Pawar group and son abhijit dhoble in opposition role
मोहोळमध्ये ढोबळे पिता-पुत्राचे निराळे सूर!

२० जुलै रोजी, भरोसा सेलच्या ज्येष्ठ नागरिक कक्षात ज्येष्ठ नागरिक कक्षात ६० वर्षीय सासू आणि सासऱ्यांची एक तक्रार प्राप्त झाली. तक्रारीत त्यांचा मोठा मुलगा व त्याची पत्नी हे वारंवार घरामध्ये भांडण करतात. तसेच, शिवीगाळ करतात आणि सासू आणि सासऱ्याला त्रास देतात, असे नमूद होते. सासऱ्यांचा स्वभाव आधीपासूनच कडक असल्यामुळे शिवाय ते वृद्ध असून मोठ्याने बोलतात. यामुळे संतप्त सुनेने अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत सासऱ्यांविरूद्ध तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता. आता मोठा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे वृद्ध सासू-सासऱ्यांशी पटतच नसल्यामुळे अखेर सासूनेच सुवर्णमध्य काढत उपरोक्त तक्रार दिली होती.

आणखी वाचा-लोकसत्ता इम्पॅक्ट : ६६० पोलीस हवालदार झाले पीएसआय; गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालयाकडून…

तक्रारीमध्ये त्यांनी नारी येथे असलेल्या त्यांच्या स्वत:च्याच दुसऱ्या घरी राहण्यासाठीची समजूत काढावी, अशीही मागणी केली होती. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी सासू-सासरे यांची भेट घेतली. त्यांनी मुलगा आणि त्याच्या पत्नीलाही बोलावून घेतले. बुधवारी त्यांना ज्येष्ठ नागरिक कक्षात एकत्रित बसवून त्यांचे समूपदेशन केले. नारीतील सासूने सुचविलेल्या घरात दुरूस्तीची कामे असल्याचा मुद्दा मुलगा व पत्नीने मांडत ही कामे करून देताच येथे राहायला जाणार असल्याची लिखित कबुली दिली. सासूनेही काम करून देण्याचे मान्य केल्यानंतर तक्रार निकाली निघाली. अशाप्रकार भांडण घेऊन आलेले कुटुंब एकाच वाहनात घराकडे परतले.

आणखी वाचा-“…तर मी स्वत:चा खून करेन,” मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू असे का म्हणाले?

जेष्ठ नागरिक कक्षाचा आधार

पोलीस आयुक्तालयातर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांना आळा घालण्याकरिता भरोसा सेल येथे ‘ज्येष्ठ नागरिक कक्ष’ तयार करण्यात आला. येथे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या सोयीच्या अनेक सेवा पुरविल्या जातात. अनेक कुटूंबातील ज्येष्ठ नागरिक हे एकटे राहत असल्याने, त्यांची सुरक्षा, मालमत्ते विषयीचे विवाद, कुटूंबातील इतर सदस्यांकडून होणारा शारीरिक व मानसीक छळ तसेच शासकिय संस्थांकडून मिळणा-या योजनांसंदर्भातील अडचणी, अशा विविध समस्याचे निवारण केले जाते. या ठिकाणी ज्येष्ठ नागरीकांची ओळखपत्रे देखील तयार केली जातात.