प्रचलित परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की, पार्थिवाला खांदा देणे असो वा मुखाग्नी घरातील पुरुषच करतो. परंतु, जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात सात बहिणींनी परिवर्तनाचे साक्षीदार होत आपल्या आईच्या पार्थिवाला खांदा देऊन मुखाग्नी दिला. ही घटना पाहून प्रत्येकाचे डोळे भरून आले होते.

हेही वाचा : पणन महासंचालनालयाच्या वार्षिक क्रमवारीत विदर्भातील बाजार समित्यांचा दबदबा

मंगरुळपीर शहरातील सेवानिवृत्त शिक्षिका सुमनबाई गेंदूलाल रापलाई यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना एक मुलगा व सात मुली होत्या. बहिणींनी आपल्या लाडक्या आईला मुखाग्नी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. अखेर त्या मुलींनी आईला खांदा देऊन मुखाग्नी दिला. या घटनेमुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. दरम्यान, त्या मुलींच्या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Story img Loader