आम्ही लाडकी बहीण योजना जाहीर केली तेंव्हा विरोधकांनी त्याची खिल्ली उडविली. आताही विरोधक त्यात अडचणी आणण्याचे आटोकाट प्रयत्न करीत आहे. यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जायचे काम नाही. मात्र, योजना पुढेही सुरूच ठेवायची असेल तर, येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला निवडून द्या, असे स्पष्ट आवाहन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी येथे केले.

बुलढाणा येथे आज गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी लाडकी बहिण सन्मान सोहळा पार पडला. बुलढाणा चिखली राज्य महामार्गावरील शारदा ज्ञानपीठच्या प्रांगणावर आयोजित या कार्यक्रमाला हजारो लाडक्या बहिणींची तोबा गर्दी उसळली होती.

Hasan Mushrif
Hasan Mushrif : “सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होणार”, मुश्रीफांचा दावा; अजित पवारांचा पत्ता कट? मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं वक्तव्य
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा
Sreejaya Ashok Chavan News
Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

यावेळी बोलताना अजितदादांनी मित्र पक्षातील ‘त्या’  नेत्यांना दोन खडे बोल सुनावत अक्षरशः कान टोचले. महायुतीतील वाचाळविरांना आवरण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र हा शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे, यशवंतराव चव्हाण सारख्या सुसंस्कृत नेत्यांचे राज्य आहे. याचे भान ठेवून नेत्यांनी भान ठेवून बोलावे, आपल्या (वक्तव्या) मुळे महायुती आणि सरकार अडचणीत येणार नाही याची काळजी घ्यावी, असा वडीलकीचा सल्ला त्यांनी दिला.

हेही वाचा >>> शिक्षक संच मान्‍यता, कंत्राटी भरती का आलीय चर्चेत? २५ सप्‍टेंबरला सामूहिक रजा आंदोलन

कुणी काहीही बोलले तर त्याला युतीचे समर्थन आहे असा परखड सल्ला देत त्यांनी कार्यक्रमाचा नूरच बदलून टाकला. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहरात उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे भरभरून कौतुक केले. इतके पुतळे महाराष्ट्र राज्यात कुठेच नसतील असे सांगून या पुतळे आणि स्मारक मुळे बुलढाण्याच्या वैभवात भर पडल्याचे त्यांनी सांगितले. या पुतळ्यांचं काळजीपूर्वक जतन करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा >>> बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात घुसण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न; काळे झेंडे दाखविले

४६०० कोटींच्या चेक वर सही करून इथे आलो

विरोधक लाडकी बहीण योजना निवडणूक नंतर बंद पडणार, असा अपप्रचार करून योजनेत अडसर आणण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात काळजी करू नका, योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही, असा दिलासा अजित पवारांनी दिला. या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच  पुढील हप्तासाठीच्या ४६०० कोटी रुपयांच्या धनादेश वर सही करूनच ईथे आल्याची माहिती त्यांनी दिली.मात्र ही योजना सुरू ठेवायची असेल पुढील निवडणुकीत कमळ घड्याळ आणि धनुष्य बाण ला निवडून आना असे ‘रोख’ठोक आवाहन त्यांनी लाडक्या बहिणींना उद्धेशून केले. केवळ बहिणीच लाडक्या आहे असे नसून  भाऊ देखील लाडके आहे, आम्हाला सर्व जनताच लाडकी असल्याचे त्यांनी स्मित हास्य करीत सांगितले, तेंव्हा  कार्यक्रम स्थळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. प्रास्ताविक बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी केले. प्रास्ताविकात आमदारांनी  बुलढाणा मतदार संघातील विकास कामांचा आढावा सादर केला. कार्यक्रमाला केंद्रीय  आरोग्य, आयुष, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, बुलढाणा   आमदार  संजय गायकवाड, सिंदखेड राजा आमदार राजेंद्र शिंगणे, चिखलीच्या आमदार श्वेता महाले, जळगाव आमदार संजय कुटे, खामगाव आमदार आकाश फुंडकर, मेहकर आमदार संजय रायमूलकर,  विधानपरिषद सदस्य किरण सरनाईक, माजी आमदार चैनसुख संचेती, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, गणेश   मानटे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी , सेनेचे जिल्हाध्यक्ष ओमसिंग राजपूत यांच्यासह  मित्र पक्षांचे पदाधिकारी हजर होते. याशिवाय विभागीय आयुक्त विभा पांडे, जिल्हाधिकारी किरण पाटील,पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारो लाडक्या बहिणींची गर्दी उसळली होती.