राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजावंदन करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचाही गौरव केला.

“अमृत कालातील स्वातंत्र्यदिनाच्या जगभरातील भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपला स्वातंत्र्यदिन, आपला तिरंगा झेंडा, निशाणी जोपर्यंत चंद्र आण सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने डौलत राहील अशी प्रार्थना करतो”, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. तसंच, जनतेला संबोधित केलेल्या भाषणातही त्यांनी हा उल्लेख केला होता.

Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Thackeray said Modi being Vishwaguru cant avoid mentioning his name
मोदी विश्वगुरू असले तरी माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना… उद्धव ठाकरे यांचा टोला

“या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मोदींनी दिल्लीमध्ये ५०० विशेष पाहुणे बोलावले आहेत. ज्यामध्ये शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे लोक, सामान्य कामगार, सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार, देशाच्या स्वातंत्र्याचे महत्त्व साजरा करताना देशातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचं काम मोदींनी केलंय. हर घर तिरंगा मोहिम राबवली आहे. मेरी माती मेरा देश या अभियानांतर्गत देशाप्रती आणि मातीप्रती सन्मानाची भावना तयार होतेय. मोदीजी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्त्वात महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाची स्वप्ने पूर्ण करत विकासासकडे जातील”, असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

गडचिरोली पोलिसांना वर्षभरात ६४ पदके

गडचिरोली पोलिसांना शौर्य पदके मिळालं आहे. याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अतिशय समाधान आहे की आमच्या गडचिरोलीच्या पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदके मिळाली. २६ जानेवारीलाही पदक मिळालं होतं. वर्षभरात ६४ पदके गडचिरोलीला मिळाली आहेत. देशभरातील सर्वाधिक पदके गडचिरोलीला मिळाली आहेत. गडचिरोलीत शांतता प्रस्थापित करण्याकरता ही पदके मिळाली आहेत. अजूनही संघर्ष संपलेला नाही. अटकलेला एक जरी व्यक्ती शिल्लक असले तर त्याला मुख्य धारेत आणावं लागेल. त्यासाठी पोलिसांना अहोरात्र सजग राहावं लागेल. देशविघातक शक्ती माओवाद्यांमध्ये पोहोचलेले झाले आहेत. गडचिरोली आणि महाराष्ट्र पोलीस सजग राहतील.”