नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्व करीत असलेल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतही लाखांहून अधिक मते भाजपला मिळाली. पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायकरित्या भाजपचे मताधिक्य कमी झाले. त्यामुळे आता काँग्रेससोबतच भाजप देखील या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर लोकसभा भाजपने सलग दोनदा चांगल्या मताधिक्याने जिंकली. त्यामुळे नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला मानला जाऊ लागला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने भंडारा येथून लोकसभेत गेलेले नाना पटोले यांना ऐनवेळी नागपुरात आणले होते. यावेळी मात्र, काँग्रेसचे शहराध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगात येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : अकोला : उमेदवारांपुढे सर्वांना एकसंघ ठेवण्याचे आव्हान! महायुती व आघाडीच्या धर्माचे पालन…

दक्षिण-पश्चिममध्ये गेल्या काही निवडणुकीची आकडेवारी भाजपच्या बाजूने असली तरी काँग्रेसने या मतदारसंघात अधिक मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येथे काँग्रेसने प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले. तसेच सर्व गटाच्या नेत्यांना सोबत घेतल्याचेही दाखवून दिले. काँग्रेसने येथे गेल्या विधानसभेत ऐनवेळी आशीष देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे मताधिक्य कमी केले होते. त्यामुळे येथे अधिक मते मिळतील, अशी आशा काँग्रेसला आहे. लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसने नागपुरात चांगली कामगिरी केली आहे.

भाजपनेही दक्षिण-पश्चिम मतदारसंघात प्रचार यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत येथे काँग्रेसला केवळ ६५,०६९ तर भाजपला १,२०,१८५ मते मिळाली होती. काँग्रेसला मतांचे हे अंतर कमी करावे लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ५९,८९३ मते मिळाली होती. तर भाजपला १,०९२,३३९ मते मिळाली होती. बसपाने येथे ७,६४६ मते घेतली होती.

हेही वाचा : चंद्रपूर : मतदानाचा सेल्फी अपलोड करा; मोटारसायकल, रेसिंग सायकल आणि मोबाईल जिंका

२०१९ लोकसभेचे चित्र

भाजप (१२०१८५ मते)
काँग्रेस (६५०६९)
बसपा (५९६२)
वंचित बहुजन आघाडी (६०५६)

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis nagpur south west assembly constituency challenge for bjp to maintain vote share rbt 74 css