नागपूर: राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली आहे. याबाबत जिल्हाधिका-यांना अहवाल पाठवण्यास सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भासह राज्याच्या विविध भागात रविवारपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे विदर्भात कापूस आणि फळबागांना फटका बसला आहे. सोमवारी नागपूर दौ-यावर असलेल्या फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्थ केले. ते म्हणाले आम्ही सर्व जिल्हाधिका-यांना पीक हानी बाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे. शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

हेही वाचा… सेवाग्रामचा चरखा थेट वेल्सच्या संसदेत! कसा झाला प्रवास वाचा…

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या सुनावणीवर बोलण्यास फडणवीस यांनी नकार दिला. महायुतीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. २६/ २२ हा जागावाटपाचा आधार असेल.पण तीनही पक्षाच्या चर्चेच्या वेळी तो बदलू शकतो, असे फडणवीस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis said that the district collector has been asked to send a report due to unseasonal rains which caused heavy crop damage cwb 76 dvr