नागपूर: प्रदूषणकारी वातावरण दूर करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून आता ‘सर्क्युलर इकानॉमी पार्क’ तयार करण्याची योजना आहे. या माध्यमातून सगळ्या प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून संपत्ती निर्माण करायची आणि सोबतच प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नागपुरातील भांडेवाडी येथे एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचा भूमिपूजन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे उपस्थित होते. प्रदूषणामुळे कुठे अवकाळी पाऊस तर कुठे दुष्काळी स्थिती निर्माण होते. हे प्रदूषण केवळ उद्योगांमुळे होत नाहीतर त्यात शहरांचा देखील मोठा सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत योजना हातात घेतली आहे. त्यामुळे शहर शाश्वत होत आहेत. नागपुरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प ‘सर्क्युलर इकानॉमी’चे उत्तम उदाहरण आहे. कचऱ्यापासून बायोगॅस, खत निर्माण होणार आहे. कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court orders MHADA to submit details of flats grabbed by developers Mumbai print news
विकासकांनी हडपलेल्या सदनिकांची माहिती असमाधानकारक ! पुन्हा माहिती सादर करण्याचे ‘म्हाडा’ला आदेश
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
special fund of 20 lakhs each to all departmental offices of Mumbai Municipal Corporation
सुविधांसाठी पालिकेचे पाच कोटी, पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांना प्रत्येकी २० लाखांचा विशेष निधी
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Garbage piles up in various places in the city due to the recruitment of election workers Mumbai news
शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग; निवडणूक कामातील कामगारांच्या नियुक्त्यांमुळे कचरा व्यवस्थापनाची घडी विस्कटली

हेही वाचा… बुलढाणा जिल्ह्यात ३४ हजार हेक्टरवरील पिकांची हानी; शेडनेटचे मोठे नुकसान, ५२ घरांची पडझड

नागपूर शहराच्या विकासाबाबत ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांत नागपूरचा सर्वांगीण विकास होत आहे. या शहराचे रूपडे बदलत आहे. पण, एका गोष्टीची खंत होती. अनेक प्रयोग केल्यावर घनकचऱ्याबाबत समाधानकारक उपाय होऊ शकले नव्हते. याच कारणाने नागपूर शहराला स्वच्छ भारत योजनेत खालचे नामांकन येत आहे. या प्रकल्पाने आता ही कमरता दूर होणार आहे. देशातील नागपूर हे शाश्वत शहर असणार आहे, असेही ते म्हणाले.