नागपूर: शिवसेना पक्षात फुट पडून दोन गट वेगवेगळे झाले आहे. तेव्हापासून उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांवर सडकून टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कार्यक्रमासाठी शुक्रवारी नागपुरात होते. याप्रसंगी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरात विविध माध्यमांशी बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले, मी आधीच बोललो आहे. ज्यांनी मला हलक्यात घेतले आहे. मी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्याच अनुषंगाने सर्वांनी माझा मूल्यमापन करायला हवे. ज्यांनी मला हलक्यात घेतले, त्यांचा मी २०२२ या वर्षीच टांगा पलटी केला. सरकार बदलले आणि लोकांच्या मनातला डबल इंजिनचा सरकार महाराष्ट्रात आणून दिला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मी स्पष्टपणे सांगितले होते. मी आणि देवेंद्र फडणवीस २०० पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा निवडून आणू. प्रत्यक्षात २३२ जागा निवडून आणल्या आहेत. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नये. ज्यांना हा संकेत समजून घ्यायचा आहे त्यांनी समजून घ्यावा, असाही टोका उद्धव ठाकरे गटाला एकनाथ शिंदे यांनी लावला. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी नागपुरात उद्धव ठाकरे गटाला चिमटे काढल्यावर आता उद्धव ठाकरे गटाकडून या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया येणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी दिलेल्या पुरस्काराबाबत म्हणाले… मला महादजी शिंदे पुरस्कार मिळाला आहे. देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हा पुरस्कार दिला आहे. एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी व्यक्तीला पुरस्कार देतो, आणि महादजी शिंदे सारख्या पराक्रमी महापुरुषाच्या नावाने पुरस्कार दिला जातो, ही मोठी गोष्ट आहे. त्यावरही टिका करणे म्हणजे त्यासंदर्भात ही लोकं किती जळले, किती जळणार, एक दिवस जळून खाक होणार, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. या प्रकरणी या लोकांकडून शरद पवार यांचाही अपमानीत करण्यात आले.

या लोकांनी साहित्यिकांना दलाल म्हणून त्यांचा अपमान केला. महादजी शिंदे यांच्या वंशज यांचाही अपमान केला. कधी तरी सुधरा. माझ्यावर कितीही आरोप करा, शिव्या द्या, जोवर जनता आमच्या सोबत आहे काहीच होणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे गटाला सुनावले.