वर्धा : जिल्ह्यासह संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या हिंगणघाट जळीतकांडातील मृत अंकिता पिसुड्डेच्या आई-वडिलांना शासकीय मदतीचा पाच लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला. देवगिरी येथे भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ, आमदार समीर कुणावार, आशीष देशमुख यांच्या उपस्थितीत दरोडा येथील अरुण नागोराव पिसुड्डे व सौ. पिसुड्डे यांनी धनादेश स्वीकारला. यावेळी अंकिताचा भाऊ व कुटुंबीय उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार, एक गंभीर

अंगावर पेट्रोल टाकून अंकिताला जाळण्यात आले होते. तिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तत्कालीन सरकारने ५ लाखाची मदत जाहीर केली होती. मात्र, ती अद्याप मिळाली नव्हती. हा खटला जलदगती न्यायालयात चालावा, ही मागणी मान्य करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत अंकिताच्या पालकांना ५ लाखाचा धनादेश दिला. अंकिता पिसुड्डे जळीत हत्याकांड संपर्ण महाराष्ट्रात कुप्रसिद्ध झाले होते. अंकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी आर्थिक मदत, तिच्या भावाला शासकीय नोकरी आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी त्यावेळी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. अंकितावर शांततेत अंत्यसंस्कार करण्यात आले होते.