लोकसत्ता टीम

नागपूर : भाजपच्या महिला नेत्या सना खान यांच्या हत्याकांडाचा तपास संथगतीने सुरु आहे. मागील महिन्यांत पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह मध्यप्रदेशमध्ये आढळला होता. मात्र, डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे तो मृतदेह सना खान यांचा नव्हताच, असे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांसमोर मृतदेह शोधण्याचे आव्हान कायम आहे.

security tightened in manipur following fresh violence
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ड्रोन हल्ल्यांविरोधात इम्फाळमध्ये मोर्चा, पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Lucknow building collapse,
Lucknow Building Collapse : उत्तर प्रदेशमध्ये तीन मजली इमारत कोसळली; पाच जणांचा मृत्यू, २४ जखमी; २८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
one and a half months Recce is done for killing Vanraj Andekar
खुनाची दीड महिन्यांपासून रेकी, वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ
diseases mumbai, diseases outbreak,
मुंबईत साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव; हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

भाजप नेत्या सना खान यांचा २ ऑगस्टला कुख्यात दारू माफिया अमित साहू याने खून केला होता. त्याने घरीच त्यांना मारले व त्यानंतर हिरन नदीत मृतदेह फेकला. सना यांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले. मात्र, मृतदेह आढळून आला नव्हता. आठ दिवसांनंतर अचानक जबलपूर पोलिसांना हरदा नदीजवळील शिराली तहसीलच्या एका विहिरीत सना यांच्यासारख्या वर्णनाचा मृतदेह आढळला होता. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने चेहरा ओळखणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून तो मृतदेह कुटुंबीयांच्या डीएनएशी जुळलेला नाही.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरण : हिना खानच्या अटकेसाठी पोलीस करतायेत टाळाटाळ?, शिनाच्या वडिलाला अटक

दरम्यान, पोलिसांनी अमित साहूच्या घरातील सोफ्यावरील रक्ताची फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या सहाय्याने चाचणी केली. तसेच डीएनए चाचणीदेखील करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असून सना खान यांच्या रक्ताशी ते रक्त जुळलेले आहे. अमित साहूच्या घरात सना खान यांचे रक्त असल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच पोलिसांनी अमित साहूच्या मोलकरनीचा जबाब नोंदविला असून तिने सना खान यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बघितले होते. सध्या पोलिसांनी सना खान यांच्या हत्याकांडात पुराव्याची जुळवाजुळव सुरु केली आहे.