वर्धा : कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या बारा वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तो मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही आश्रमशाळा आर्वीचे आमदार दादाराव केचे यांच्या संस्थेची आहे. आज सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे. रात्री नऊ वाजता ही घटना उजेडात आली. प्राप्त माहितीनुसार रात्री मुलं झोपायची तयारी करीत असताना गाद्या काढण्यास गेले होते. त्यावेळी ही घटना उजेडात आली. माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.

हेही वाचा – गडचिरोली : शालेय शिक्षणातून ‘फुलोरा’ उपक्रप वगळा, शिक्षकांसह मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही विरोध

हेही वाचा – धक्कादायक! सिगारेटचे चटके देऊन चिमुकलीचा अनन्वित छळ, घरकामासाठी परराज्यातून आणले

आमदार केचे म्हणाले की, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. दुपारी मुलं गादी वर गादी रचून खेळत होते. नंतर काही निघून गेले. त्यात हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता मुलं बोलून दाखवीत आहे. या आश्रमशाळेत इतर कुठेही नसतील इतक्या सुविधा आहेत. काहीच निष्काळजीपणा होत नाही. मात्र झाले ते वाईटच. पोलीस चौकशी सुरू आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead body of a boy found at the tribal ashram school of yadavrao keche in nara wardha district pmd 64 ssb
Show comments