ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील आलेसूर गावाजवळ मारुती दुधमुळे यांच्या शेतात रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचा मृतदेह सापडला. ताडोबालगत लागोपाठ दोन दिवसात दोन वाघांचे मृतदेह सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा नरवाघ असून अंदाजे त्याचे वय १० ते १२ वर्षे आहे. वयोवृद्ध अवस्था किंवा भुकेने वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ताडोबात वाघाचा मृतदेह सापडला
ताडोबालगत लागोपाठ दोन दिवसात दोन वाघांचे मृतदेह सापडल्याने वन खात्यात खळबळ उडाली आहे.
Written by रत्नाकर पवार
First published on: 14-12-2015 at 06:38 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dead tiger found at tadoba