लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेहकर येथील दोन गटातील संघर्षाची घटना ताजी असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सुनील कोल्हे असे गंभीर जखमी पदाधिकाऱ्याचे नाव असून ते राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे मोताळा तालुका अध्यक्ष आहेत. सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या आसपास हा हल्ला करण्यात आला. मोताळा तालुक्यातील तालखेड ते तालखेड फाटा दरम्यान ही घटना घडली. गंभीर जखमी तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांना मोताळा येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांचा डावा हात आणि डावा पाय ‘फॅक्चर’ झाल्याची माहिती आहे.

आणखी वाचा-कुनोत पुन्हा एकदा पाळणा हलला.. मादी चित्ता ‘निरवा’ने..

मोताळा तालुक्यातील तालखेड आणि तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला. हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भर्ती करण्यात आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तथा नुकतेच पार पडलेल्या बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. महाविकास आघाडीचे अन्य नेते, पदाधिकारी देखील रुग्णालयात दाखल झाले. जयश्री शेळके यांनी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

आणखी वाचा-अलीम पटेल यांना चक्क ५४ हजार मते; कशी साधली किमया…

“महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राण घातक हल्ले केले जात आहे निकालाच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी जयश्रीताई यांनी केली आहे. दरम्यान, कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deadly attack on ncp taluka president sunil kolhe in buldhana scm 61 mrj