चंद्रपूर: प्रेमाला वयाचे बंधन नसते. मात्र, प्रेमासारख्या पवित्र भावनेला अभिव्यक्त होण्यासाठी शब्दाचीही गरज नसते. याचीच प्रचिती गोंडपिपरी येथे अनुभवायला मिळाली. प्रियकर व प्रेयसी दोघेही जन्मजात मूकबधिर. बोलायला शब्द नाही. ऐकायला नैसर्गिक ध्वनी यंत्रही नाही. मात्र, दोघांच्याही मनात प्रेमाची भावना होती. दोघांनीही एकमेकांच्या मुक्या प्रेमभावनांना समजून घेत विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नगाठी या देवाघरी बांधल्या जातात तसाच प्रत्यय गोंडपिपरीवासीयांनी अनुभवला.
सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास गोंडपिपरी येथे मूकबधिर सुनीता व मूकबधिर रामदासचा अनोखा विवाह मासुम धनवंती दर्ग्यात पार पडला. मूकबधिर सुनीता लिंगा मोहूर्ले (४२, रा. नागेपल्ली, पो.आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली) व चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील मूकबधिर रामदास प्रल्हाद धोडरे (३८) यांची मैत्री जुळली. मूकबधिर प्रल्हाद हा नेहमी मजुरीनिमित्त नागेपल्ली परिसरात जायचा. अशातच दोघांचे प्रेमाचे सूत जुळले. सुनीता घरून पळून गोंडपिपरी येथील मैत्रिणीकडे आली. सुनिताचा घरच्यांनी शोध घेतला असता आढळून न आल्याने हरवल्याची तक्रार अहेरी पोलिसात दाखल केली होती. त्यानंतर अहेरी पोलिसांना मुलगी गोंडपिपरीत मूकबधिर मुलाकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर घटनेची माहिती गोंडपिपरी ठाणेदार जीवन राजगुरू यांना देण्यात आली. राजगुरूंनी गोंडपिपरी शहरात शोध घेतला असता, मुलगी मैत्रिणीकडे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुलाला व मुलीला पोलीस स्टेशनला बोलावून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
हेही वाचा >>>वर्धा : लाजराबुजरा साळींदर रस्त्यावर उतरला, अन्…
मुलीने स्वगावी जाणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुरेश चरडे, कोतवाल संघटनेचे पदाधिकारी गजानन बटे, सदाशिव बोरकुटे, सुभाष नेवारे,अक्षय नरशेटीवार यांना माहिती होताच त्यांनी दोघांच्या सहमतीने विवाह लावून देण्याची तयार दर्शविली. विवाह नोंदणीची प्रक्रिया पार पाडत दर्ग्यात संस्थेतर्फे लग्न लावून देत सामाजिक दायित्व जोपासले. मुलाला वडील नसून आई मूकबधिर आहे. मुलीला देखील वडील नसून आई व एक मोठा भाऊ आहे. या लग्नसोहळ्याला अनेक मुकबधिरांची उपस्थिती होती. सध्या या अनोख्या मूकबधिर प्रेमीयुगुलाचा विवाह गोंडपिपरी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या लग्न सोहळ्याला पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले.