अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता रजेवर गेल्या आहेत. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार वाऱ्यावर आला. रुग्णाची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेता आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी दुपारी सर्वोपचार रुग्णालय गाठून झाडाझडती घेतली. रुग्णसेवेतील हयगय खपवून घेणार नाही. तात्काळ रुग्णसेवा व उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालयाला अकस्मात भेट दिली. अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये ८ ऑगस्टपासून सरकारी कार्यक्रमाच्या नावावर १७ ऑगस्टपर्यंत रजेवर आहेत, अशी माहिती देण्यात आली. प्रभारी नसल्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे. अनेक रुग्णांनी गैरसोय होत असल्याची तक्रार केली. रुग्णालयाची अनेक यंत्र बंद अवस्थेत आहेत. तसे रुग्णालयातील गैरकारभाराबाबत आमदार रणधीर सावरकर यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली.

kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Two arrested in conspiracy to murder Ambernath MLA Dr Balaji Kinikar thane news
शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट ? अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कटात दोघे अटकेत
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
criem news
विशाल गवळीने घरातच मुलीवर अत्याचार करून केली तिची हत्या , पत्नीच्या साह्याने मृतदेहाची विल्हेवाट
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

हेही वाचा >>> आयआयटी टॉपर, ‘आयपीएस’साठी ३५ लाखांची नोकरी नाकारली; आयएएस अधिकाऱ्याशी लग्न

महाविद्यालयाच्या कारभारावर त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्ह्यासह बुलढाणा, अमरावती, वाशीम व हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. त्यांना हेलपाटे होणार नाही याकडे लक्ष केंद्रित करा, बंद यंत्रसामुग्री सुरू करा, सर्वसामान्य नागरिकांच्या संवेदना जाणून काम करा, अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या. अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्या कारभारासंदर्भात अनेक तक्रारींचा पाढा यावेळी वाचण्यात आला.

हेही वाचा >>> सुनील केदार यांनाच उमेदवारी द्या; वर्धा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आग्रह

यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर आ.सावरकर यांनी चर्चा केली. अधिष्ठाता रजेवर गेल्यामुळे जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशाही सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी गिरीश जोशी, वसंत बाछुका, देवाशिष काकड, मोहन पारधी, किशोर मालोकार, गणेश तायडे, किशोर कुचके, सचिन बायस, अक्षय जोशी, संतोष पांडे, निलेश दिनोरे, पवन महाले, राजेश बेले, शंकर वाकोडे आदी सोबत होते.

Story img Loader