लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील नारा येथील यादवराव केचे आदिवासी आश्रमशाळेत शिवम उईके या १२ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला असून विद्यार्थी दुपारच्या जेवणाला नसताना रात्रीपर्यंत त्याची साधी चौकशीही करण्यात आली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मात्र, ही शाळा आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांची असल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ५२९ आश्रमशाळा आहेत. त्यात १ लाख ७५ हजारांवर विद्यार्थी शिकत आहेत. यात ७५ हजारांवर विद्यार्थिनी आहेत. २० हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत. मात्र मूलभूत सुविधांअभावी विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. जेवणातून विषबाधा होऊन विद्यार्थी आजारी होणे, विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन या घटना जणू नित्याच्याच झाल्या आहेत. त्यात आता भाजप आमदाराच्याच आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेला शिवम उईके हा मेळघाट येथील डोमा गावचा रहिवासी होता. बुधवारी रात्री ही घटना उजेडात आली.
आणखी वाचा-धक्कादायक! पती अनैतिक संबंधात ठरला अडसर; पत्नीने वडिलांच्या मदतीने केली हत्या
…तर शिवमचा जीव वाचला असता
शिवम दुपारच्या जेवणाला गेला नाही. तो अनुपस्थित का, याची चौकशी येथील कर्मचाऱ्यांनी केली नाही. दुपारी जर त्याचा शोध घेतला असता तर योग्यवेळी आवश्यक उपचार देऊन त्याचा जीव वाचवता आला असता, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
राज्यभरात १८ वर्षांत १ हजार ४०० विद्यार्थ्यांचा मृत्यू
विदर्भात आश्रमशाळांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, या आश्रमशाळांमध्ये आरोग्य, स्वच्छतेचा मुद्दा गांभीर्याने हाताळला जात नाही. त्यामुळे सर्पदंश, पाण्यात बुडणे, आजारपण असे प्रकार घडतात. २००२ ते २०२० पर्यंत राज्यातील १ हजार ४०० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
आश्रमशाळांमधील मृत्यूच्या घटना अत्यंत चिंतेची बाब आहे. यासाठी आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, पालक, विद्यार्थी आणि एक अधिकारी अशी नियंत्रण समिती असून त्यांच्याकडून शाळांमधील मूलभूत सुविधांची पाहणी होणे आवश्यक आहे. यामुळे वचक राहील. नाहीतर एरवी राजकीय पुढाऱ्यांच्या शाळांवर अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. -दिनेश शेराम, अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. दुपारी मुले गादीवर गादी रचून खेळत होते. नंतर काही मुले निघून गेली. त्यात हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता मुलांनी बोलून दाखवली. इतर कुठेही नसतील इतक्या सुविधा या आश्रमशाळेत आहेत. निष्काळजीपणाची शक्यताच नाही. मात्र जे झाले ते वाईट आहे. -दादाराव केचे, आमदार व संस्थाचालक.
प्राथमिक तपासणीत मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा आढळून आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे पत्र संस्थाचालकांना दिले आहे. -दीपक हेडाऊ, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विभाग वर्धा.