चंद्रपूर: गाय म्हशीच्या कळपात अडकलेल्या पाेंभुर्णा वनपरिक्षातंर्गत येत असलेल्या पिपरी दिक्षीत वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५४३ मध्ये जखमी वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गुरूवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास बेंबाळ येथील नागरिकांना गावाजवळ वाघीण आढळून आली होती. वाघीण अशक्त असल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केल्यानंतर मृतदेह जाळण्यात आला. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, या वाघिणीने चक्क गाय व म्हैसींचा कळप रोखून धरला होता. बराच वेळ झालातरी वाघिणीने कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर म्हैसींच्या कळपाने चक्क वाघीणीवर हल्ला चढवित हुसकावून लावल्याची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती.
हेही वाचा… VIDEO: म्हशीच्या कळपाने चक्क वाघावर चढविला हल्ला, चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल
वाघिण अशक्त असून कोणतीही शिकार करण्याची ताकद त्यांच्यामध्ये नसल्याचे चित्रफीतीतून स्पष्ट होत होते. त्यानंतर काही वेळातच वाघिणीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.