वर्धा : शनिवारपासून (४ जून) बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मित्रांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने आर्वी शहरात शोककळा पसरली आहे. देवांश नीलेश घोडमारे (१४, आसोलेनगर) व युगंधर धर्मपाल मानकर (१५, साईनगर) अशी मृतांची नावे आहेत.

देवांश आणि युगंधर शनिवारी दुपारी पाच वाजता खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडले, मात्र रात्र होऊनही घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. मुलांचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, शहापूर शिवारातील राजेश गुल्हाने यांच्या शेतातील शेतमजुराला विहिरीत दोन मृतदेह आढळले.

हेही वाचा : लातूरमध्ये लग्नाला आलेल्या वऱ्हाडावर कोसळला दुःखाचा डोंगर, सख्ख्या भावांसह तिघांचा बुडून मृत्यू

पोलिसांनी दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. दोघांचेही कपडे, सायकल व चप्पल विहिरीच्या काठावर आढळून आल्यामुळे ही मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरल्याची व त्यातच घात झाल्याची शंका व्यक्त होत आहे. दोघेही नवव्या वर्गात शिकत होते.

Story img Loader