घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली. सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडांचे नाव आहे. दोन्‍ही भाऊ रविवारी रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते.

रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला व त्याने दोघाही भावांना दंश केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्‍याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले. दोघाही भावांना आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, थोरला भाऊ उत्कर्ष याचा रात्री मृत्यू झाला. धाकटा सुशील याला रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Story img Loader