अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्‍याबाबत एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नवनीत राणा यांना जीवे मारण्‍याची धमकी देण्‍यात आली आहे. गेल्‍या चार ते पाच दिवसांपासून नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी देत असल्‍याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्‍यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार नवनीत राणा यांचे खासगी सचिव विनोद गुहे यांनी येथील राजापेठ पोलीस ठाण्‍यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्‍या १६ ऑगस्‍टपासून विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर संपर्क साधून गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देत असून त्‍याने अश्‍लील शिवीगाळदेखील केल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.

हेही वाचा – खळबळजनक! लॉजवर प्रेयसीसोबत घालवली रात्र; सकाळी प्रियकर मृतावस्थेत सापडला

हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात बेरोजगारीचा स्फोट, तीन वर्षांत ४ लाख ३१ हजार बेरोजगारांची नोंद

या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपीच्‍या विरोधात भादंवि ५०४, ५०६ (ब) कलमान्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. गेल्‍या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्‍यास तुम्‍हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा यांना देण्‍यात आली होती. या प्रकरणी राणांनी नवी दिल्‍ली येथील नॉर्थ अव्‍हेन्‍यू पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. आता धमकीचा नवीन प्रकार समोर आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to navneet rana case filed mma 73 ssb