भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुर येथील त्यांच्या कार्यलायत धमकीचा फोन आला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आली असून, खंडणी मागण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नितीन गडकरी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. गडकरी यांच्या वर्धारोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी मिळल्याच्या वृत्ताला पोलीस आणि जनसंपर्क कार्यालयातील प्रतिनिधींनी दुजोरा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणा-या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्यातासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to nitin gadkari two crore ransom demanded in the name of dawood msr