नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन टपाल कार्यालयात येणा-या ग्राहकांना इंटरनेट बंद असल्याचे सांगून तेथील कर्मचारी परत पाठवत आहे. शुक्रवारीही असाच प्रकार घडला.टपाल कार्यालय फक्त टपाल तिकीट खरेदी विक्री किंवा मनीऑर्डर करण्यापुरतेच मर्यादित राहिले नाही तर तेथे बॅंकिंग व्यवहारही होत असल्याने गर्दी होते.

चिंचभुवन टपाल कार्यालय लोक पैसे घेणे किंवा काढण्यासाठी जातात पण नेहमीच तेथील कर्मचारी इंटरनेट बंद आहे, संथ आहे, असे जुजबी कारणे देऊन ग्राहकांना परत पाठवतात. शुक्रवारी सुध्दा याच कारणामुळे ग्राहकांना परत पाठवण्यात आले. या कार्यालयात इंटरनेट सेवा नाही का? असा सवाल नागरिक करू लागले आहे.

Story img Loader