सौरभ कुलश्रेष्ठ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुधारित नागरिक कायदा हा राज्यघटनेशी सुसंगत आहे की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरच महाराष्ट्रात या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
भाजपने लागू केलेल्या या कायद्यामुळे देशभरात वातावरण पेटले असून, देश एकसंध ठेवण्याच्या सावरकरांच्या तत्त्वात हे बसते का याचे उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव घेणाऱ्या भाजपने द्यावे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. सावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका कायम असून या व इतर विषयांवर महाविकास आघाडीत राजकीय मतभिन्नता असली तरी राज्य सरकारमध्ये मात्र एकवाक्यता आहे, असेही उत्तर ठाकरे यांनी विरोधकांना दिले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. सुधारित नागरिक कायद्याबाबत शिवसेनेने भूमिका बदलली नसून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काही लोक या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे हा कायदा देशाच्या घटनेशी सुसंगत आहे की नाही याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर या कायद्याबाबत भूमिका ठरवण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या कायद्यामुळे देशातील अनेक राज्यांत वातावरण पेटले आहे. इतर देशांतून आलेले हिंदूही त्यामुळे असुरक्षित झाले आहेत. भाजप सावरकरांना मानतो. मग देश एकसंध राहील यादृष्टीने का काम करत नाही. अल्पसंख्य हिंदू व इतरांना त्रास दिला तर गाठ भारताशी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारी देशांच्या सरकारला का ठणकावले नाही, असा सवालही ठाकरे यांनी केला.
देशात गरिबी, बेरोजगारी व इतर अनेक प्रश्न आहेत. त्यावरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप मुद्दाम वेगवेगळे वाद निर्माण करत आहे, असा आरोपही सुधारित नागरिक कायदा आणि सावरकरांवरून सुरू असलेल्या राजकारणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी केला. लोकांना तणावात ठेवा, गोंधळ निर्माण करा व राज्य करा असे भाजपचे धोरण दिसते, अशी टीका ठाकरे यांनी केली.
चहा दिन अन् बहिष्कार
विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र चहापान करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आम्ही विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. पण चहापानावर बहिष्काराची दुसरी एक पोटप्रथा सुरू झाली असून त्यानुसार त्यांनी बहिष्कार टाकला. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लहानपणी चहा विकायचे. तेथून त्यांनी पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली ही अभिमानास्पद बाब आहे. तरीही भाजपने चहापानावर बहिष्कार टाकावा हे कितपत सुसंगत आहे, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढला.