नागपूर: अखंड हिंदूंचे अराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मंदीर आणि श्रीरामाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. त्यासाठी देशभरातून लोक अयोध्येला जाणार आहे. लोकभावना लक्षात घेता यादिवशी महाराष्ट्र सरकारने एक दिवसाची सुटी जाहीर करावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “…म्हणून लग्नासाठी मुलगी मिळत नाही”, शेतकरी पुत्रांची विधानभवनावर धडक, म्हणाले…

हेही वाचा – रूफ टॉप हॉटेलवर बंदी येणार? राज्य शासन धोरणात्मक निर्णय…..

विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना आमदार सरनाईक म्हणाले, राम जन्मभूमी येथे होणाऱ्या भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जगभरातून लोकं येणार आहेत. त्याचा साक्षिदार होण्यासाठी समस्त हिंदू बांधव हे आयोध्येला जाणार आहेत. या दिवसाचे साक्षिदार होण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे यादिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करावी यासाठी आपण, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर केले आहे. वर्षामधली एखादी सार्वजनिक सुटी रद्द करून त्या जागी २२ जानेवारी या दिवशी सुटी जाहीर करावी. अशा पद्धतीने सुट्टी जाहीर केली तर सर्वसामान्यांना त्याचा फायदा होईल, अशी विनंती मी केल्याचेही प्रताप सरनाईक म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declare a holiday on the day of opening of ram temple in ayodhya the demand of the shinde group mnb 82 ssb
Show comments