बुलढाणा : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मनसेचे बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे यांनी केली आहे. मोझॅकग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची पूरक मागणीही त्यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाण्यात यंदा अनियमित व अपुरा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाचे दिवस साधारणत: ४६ मानले जातात. मात्र यंदा केवळ ३९ दिवसच पाऊस झाल्याचे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यापरिणामी जिल्ह्यातील मुख्य पीक व ३ लाख ८० हजार हेक्टरच्या आसपास पेरा झालेल्या सोयाबीनची वाढ खुंटली. यातच यलो मोझॅकचा पिकाला जबर फटका बसला. उत्पादनात मोठी घट येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – आता ‘या’ समाजासपण मिळणार ओबीसीमधून आरक्षण?

सोंगणीमुळे चित्र स्पष्ट

सध्या सोयाबीनचा हंगाम सुरू आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी सोंगणी आणि मळणी एकाच वेळी केल्याने सरासरी उत्पन्नाचा अंदाज येवू लागला आहे. एकरी उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. सोयाबीन, कपाशीचा लागवड खर्चही निघत नाही. तसेच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अपुरा जलसाठा आहे. ही परिस्थिती दुष्काळसदृश्य असल्याने शासनाने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ठोस मदत करावी, अशी मागणी रिंढे यांनी केली आहे.

हेही वाचा – नागपूरसह वाराणसी, मुंबईत छापे; विदेशातून तस्करीचे ३१ किलो सोने जप्त

दुष्काळ जाहिर करा

परतीचा पाऊस आला असता तर किमान जल पातळी वाढली असती. यंदा पावसाचे प्रमाण खुपच कमी आहे. जलसाठे अर्धे – अधिक कोरडे आहे. याचे नियोजन आतापासून करावे व जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Declare drought in buldhana district mns demand scm 61 ssb
Show comments