चंद्रशेखर बोबडे,लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : पुरुषांप्रमाणेच महिलांनीही  लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रात भक्कमपणे उभे राहता यावे म्हणून सरकारकडून विशेष  योजना राबवल्या जातात. मात्र त्यानंतरही या क्षेत्रात मागील चार वर्षांत पुरुषांच्या तुलनेत महिलांचा टक्का कमी  होताना दिसतोय.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या ‘उद्योग आधार’ या पोर्टलवर व्यक्तिगत पुरुष  व महिला संचालित उद्योगांची नोंदणी केली जाते. त्यावरील २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांतील देशातील नोंदणीचे प्रमाण पाहिले तर पुरुषांच्या तुलनेत महिला संचालित उद्योगांची नोंदणी कमी झाल्याचे दिसून येते.   २०१७-१८ ते २०२०-२१ या दरम्यान पुरुष संचालित एमएसएमई प्रमाण ७७ ते ८५ टक्के होते. त्यातुलनेत  महिला संचालित उद्योगांचे प्रमाण २२ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर खाली आल्याचे दिसून येते. वर्षनिहाय आकडेवारी बघितली तर ही बाब अधिक  स्पष्ट होते.

२०१७-१८ पुरुष संचालित उद्योग नोंदणीचे प्रमाण ७७.५ टक्के, २०१८-१९ मध्ये ७९ टक्के,२०१९-२० मध्ये ७८.५ टक्के तर २०२०२१ मध्ये ८४.५ टक्के होते. याच काळात महिला संचालित उद्योग नोंदणीचेच प्रमाण अनुक्रमे २२.५ टक्के,२१ टक्के,२१ टक्के  व १५.५ टक्के, असे कमी-कमी होत गेले. 

महिलांना या क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून महिला उद्योजिकांसाठी विशेष योजना राबवल्या जातात. सार्वजनिक खरेदी धोरणांतर्गत २५ टक्के खरेदी ही छोटय़ा उद्योगांकडून करावी लागते. त्यात ३ टक्के खररेदी ही महिला संचालित उद्योगाकडून करणे अनिवार्य  आहे.