अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात रेल्‍वे मार्गावर घडणारी गुन्‍हेगारी नियंत्रणात आली आहे. बहुतांश गुन्‍हे हे गर्दीच्‍या वेळी घडतात. रेल्‍वे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत अधिक दक्षता बाळगल्‍याने गुन्‍ह्यांचे प्रमाण कमी झाल्‍याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भुसावळ विभागात गेल्‍या जुलै महिन्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्‍याचे दिसून आले आहे. जुलै २०२२ मध्ये २०३६ च्या तुलनेत जुलै २०२३ मध्ये प्रवाशांच्या सामानाच्या चोरीच्या घटना १५७३ पर्यंत कमी झाल्या आहेत. तसेच महिलांवरील गुन्ह्यांची संख्या जुलै २०२२ मधील १८ वरून जुलै २०२३ मध्ये १३ इतकी कमी झाली आहे. लुटमारीची प्रकरणे जुलै २०२२ मधील ३२ वरून जुलै २०२३ मध्ये २० इतकी कमी झाली आहेत.

हेही वाचा – वर्धा : कुलगुरूनंतर आता प्र- कुलगुरूंचा महिलेशी वाद, प्रकरण भीतीपोटी तात्काळ पोलिसांकडे

हेही वाचा – दिमाखदार कडी असलेला शनी ग्रह २७ ऑगस्टला पृथ्वीजवळ, दुर्बिणीने पाहता येणार विलोभनीय दृश्‍य

रेल्वे बोर्डाकडून स्थानकांवरील आणि धावत्या गाड्यांमधील सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे. यासाठी नवनवीन उपकरणांचा उपयोग केला जात आहे. चोरीच्‍या घटनांना पायबंद घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्‍वे स्‍थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्‍यात आल्‍या आहेत. रेल्वे स्‍थानकांवर येणारे-जाणारे प्रवासी व आऊटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगरांवर नजर ठेवली जाते. प्रवेशद्वार, प्लॅटफॉर्म, यार्ड, आऊटर या परिसरावर कॅमेऱ्यांद्वारे आरपीएफची नजर असते.