चार वर्षांपूर्वी उपराजधानीत किमान तापमानाचा आठ दशकांचा विक्रम मोडीत निघून ३.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद करण्यात आली होती. आता चार वर्षानंतर हा विक्रम पुन्हा मोडीत निघणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यापासून नागपूरसह विदर्भातील इतरही शहरांच्या किमान तापमानात वेगाने घट होत आहे.
विदर्भात गेल्या आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढला असून उपराजधानीसह संपूर्ण विदर्भ गारठला आहे. २०२१ व २०२२ या दोन्ही वर्षात डिसेंबर अखेरीस किमान तापमान सात ते आठ अंश सेल्सिअसदरम्यान होते. यावर्षी जानेवारी महिन्यात पाऱ्यात घसरण सुरू झाली. आता शीतलहरीमुळे गारठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. हवामान खात्यानेही थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा इशारा दिला आहे. सायंकाळपासूनच रस्त्यांच्या कडेला, घरातील अंगणामध्ये शेकोट्या पेटत आहेत. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ व लहानग्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी ‘हिटर’ सुरू करण्यात आले आहेत. थंडीच्या लाटेमुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>करोनात पती गमावलेल्यांना अडीच हजारांची प्रतीक्षाच; वाढीव मदतीला सरकारकडून विलंब
सलग दुसऱ्या दिवशीही हुडहुडी
सलग दुसऱ्या दिवशीही विदर्भातील अनेक शहरांमधील किमान तापमानात घट दिसून आली. अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ या शहरात काही अंशाने घट झाली. गोंदियात ७, नागपूर व यवतमाळ ८.५, गडचिरोली ९.६, अमरावती व वर्धा ९.९, बुलढाणा व चंद्रपूर दहा, अकोला व ब्रम्हपुरी १०.४ तर वाशीम येथे ११.८ किमान तापमानाची नोंद करण्यात आली.