वर्धा: पाऊस बऱ्यापैकी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्ताविला. त्याची दखल घेत शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी लगबग उडाली. मात्र, बाजारात बियाण्यांचा ठणठणात असल्याची स्थिती दिसून आल्याने शेतकरी चिंतेत पडले. आज त्यांची त्रेधातिरपीट  उडल्याचे दिसून आले. कृषी खात्याने एक जुनपासून  कापूस बियाणे विक्री करण्याचे निर्देश दिले होते. मात्र नंतर ती मुदत बदलून १६ मे ही तारीख निश्चित झाली.

आज पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी बाजारात धाव घेतली तेव्हा बियाणे तुटवडा  दिसून आलं. बियांण्यांची  मागणी अधिक पण पुरवठा कमी असल्याचे चित्र राहले. अंकुर सीड्सचे वैभव काशीकर म्हणाले की खराब हवामान व अन्य काही बाबींमुळे बियाणे उत्पादनात नेहमी पेक्षा घट आली आहे. पण ही स्थिती तात्पुरती आहे.

issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Constant changes in the states climate But wait for the winter
राज्यात थंडीची प्रतिक्षाच! पाऊस मात्र…
Maharashtra winter updates
Winter News: नोव्हेंबरमध्ये अपेक्षित थंडी नाहीच; मध्य, दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद
Mumbai air quality remains in moderate category
दिवाळीच्या दिवसांत मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच; कोणत्या भागातील हवा ‘अतिवाईट’?

हेही वाचा >>>लहानपणी कचऱ्यात सापडलेल्‍या मुलीची गगनभरारी; अनाथ-अंध मालाचे एमपीएससीत यश

ठराविकच बियाणेचा आग्रह सोडावा लागणार. देशभरात कमी पुरवठ्याची स्थिती आहे.काही दिवसात स्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास काशीकर यांनी व्यक्त केला.पूर्वी एक जुननंतर  बियाणे विक्री होत होती. तसेच पेरणीस सुरवात १५ जून पासून केल्या जाण्याची रीत आहे.आता मुदती पूर्वीच विक्री आदेश आल्याने गडबड झाल्याचे मत कृषी केंद्रचालक व्यक्त करतात. प्रख्यात कृषी व्यावसायिक मदन राठी म्हणाले की नामांकित कापूस बियाणे भरपूर उपलब्ध आहे. पण हेच हवे असा आग्रव तूर्तास मान्य करता येत नाही.

अजून बियाणे माल येणार आहे. तुटवडा  राहणार नाही. दोन तीन दिवसात बियाणे ओरड बंद होईल, असा विश्वास राठी यांनी व्यक्त केला. जिल्हा कृषी अधीक्षक प्रभाकर शिवणकर यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

हेही वाचा >>>नक्षत्र भ्रमणानुसार हवामान अंदाज, तज्ज्ञ काय सांगतात ?

मात्र कृषी निविष्ठा बाबत काहीच गोंधळ उडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२४-२५ करिता ४ लक्ष ३३ हजार ३४० हेक्टर क्षेत्राचे पेरणीचे नियोजन असून आवश्यक असणारे बियाणे, रासायनिक खते आदी कृषि निविष्ठांची कमतरता भासणार नाही. यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृषि विभागाला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे, पाणी फाऊंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, उपविभागीय कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, बियाणे कंपन्याचे प्रतिनिधी, रासायनिक खते कंपन्याचे प्रतिनिधी व खते वाहतूकदार यावेळी उपस्थित होते.खरीप हंगामासाठी ४ लक्ष ३३ हजार ३४० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यासाठी ६८ हजार ७७ क्विंटल बियाण्यांची मागणी शासनाकडे करण्यात आली असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. बियाणे कंपन्यांनी नियोजनाप्रमाणे हंगामापूर्वी बियाण्यांचा पुरवठा करावा तसेच जिल्ह्यामध्ये बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, यासाठी कृषि विभागाने दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

रासायानिक खत कपन्यांनी कृषि विभागाच्या संपर्कात राहून मागणीनुसार योग्य पुरवठा करावा व तालुका निहाय मंजूर करण्यात आलेल्या आवंटनानुसार पुरवठा करण्यात यावा. रासायनिक खतांच्या उपलब्धतेबाबत नियमित आढावा घ्यावा. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, चढ्या दराने खतांची विक्री होणार नाही तसेच रासायनिक खतांसोबत लिंकीग म्हणून ईतर खते देण्यात येत असल्यास तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिले.

यावेळी वाहतूकदारांनी बियाणे व रासायनिक खतांचा वाहतूक करतांना येणाऱ्या समस्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या. वाहतुकदारांना येणाऱ्या समस्या सोडविण्यात येतील. कृषि निविष्ठांचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत येत असल्याने ऐन हंगामात बियाणे व खते वेळेवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वाहतुकदारांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.

बोगस बियाण्यांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाव्दारे जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर आठ असे एकूण नऊ भरारी पथके तयार करण्यात आले आहे. कृषि केंद्र व जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी करण्यात येत असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री  क्रमांकावर शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.