नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’चे बांधकाम पूर्ण झालेले नसताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. अर्धवट सेंटरचे डॉ. आंबेडकर जयंतीदिनी लोकार्पण करून प्रशासनाने जनतेचा अपमान केला आहे. या प्रकरणात दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी आणि तातडीने बांधकाम पूर्ण करून जनतेसाठी तो खुला करण्यात यावा, या मागणीसाठी अतुल खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली सिनियर सिटीझन फोरमने गुरुवारी निदर्शने केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… NEET परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे धडे मिळणार; अकोल्यात वैद्यकीय प्रवेशपूर्व मार्गदर्शन

हेही वाचा… अमरावतीत वाळू धोरण रखडल्‍याने बांधकामे ठप्‍प

या आंदोलनात नरेश साखरे, अश्विन बोरकर, मंगेश नागदेवे, अजय गौतम, पंचम गायकवाड, अशोक गजभिये, अनिल वासनिक, प्रशांत भेले सहभागी झाले होते. उत्तर नागपुरातील कामठी रोडलगत ग्रेन गोडाऊनचे जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कन्व्हेंशन सेंटर’ उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण १४ एप्रिल २०२३ रोजी झाले. त्यानंतर लगेच सामाजिक कार्यासाठी ते उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. परंतु ते अद्यापही लोकांसाठी सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत माहिती घेतली असताना सभागृह, कॅफेटेरिया, ४० फुटाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती, सांस्कृतिक थिएटरची बैठक व्यवस्था, कॉन्फरन्स हॉल आणि परिसरातील कामे अपूर्ण अल्याची बाब समोर आली आहे. लोकार्पण होऊन तीन महिने झाले तरी पेव्हर ब्लॉक, खिडक्यांच्या काचा बसवण्याचे काम शिल्लक आहे. तसेच वातानुकूलित यंत्रणांचे काम देखील व्हायचे आहे. अशाप्रकारे प्रशासनाने अर्धवट कामे असताना डॉ. आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून लोककार्पण केले. हा आंबेडकरी जनतेचा घोर अपमान आहे, असे अतुल खोब्रागडे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dedication of project without its completion is an insult to the public agitation by senior citizen forum led by atul khobragade rbt 74 asj
Show comments