नागपूर : राज्यात शिवसेना- भाजपचे सरकार स्थापण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट दिल्लीत घेतली होती. या भेटीदरम्यान मुंबईत पोहोचल्यावर १५ दिवसांत महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून युतीची पुनर्स्थापना करण्याचा शब्द मोदींना ठाकरेंनी दिला होता. मात्र नंतर त्यांनी वेळकाढूपणा केल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला, तर भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिल्यामुळेच आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद स्वीकारले, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला.

हेही वाचा >>> “एकनाथ शिंदेंच्या नावाने सेटलमेंट्स होतात”, आव्हाडांच्या वक्तव्यावर शंभूराज देसाई संतापले

Union Minister Muralidhar Mohol friend visit in Kolhapur pune news
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
gang stabbed young man with koyta in dandiya event
दांडीया कार्यक्रमात टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने वार; सराइतासह साथीदारांविरुद्ध गुन्हा
Supporters urge Ajit Pawar to contest from Baramati Assembly Constituency pune print news
अजित पवारांनी बारामतीमधूनच लढण्याचा सर्मथकांचा आग्रह
Released on Tuesday for 2030 houses of MHADA Mumbai Mandal Mumbai news
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांसाठी मंगळवारी सोडत; एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार स्पर्धेत
shinde shiv sena set up entire system required for modi rally in thane
पंतप्रधानांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांची छाप
Imtiaz Jaleel, case against Imtiaz Jaleel, Pune,
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल
sharad pawar, pm narendra modi
“पंतप्रधान मोदींच्या अगाध ज्ञानाचं…”; महात्मा गांधींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून शरद पवारांचा टोला!

आमदार अपात्रताप्रकरणी सुनावणीच्या चौथ्या दिवशी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि दीपक केसरकर यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांकडून घेण्यात आली. ७२ प्रश्नांनंतर सामंतांची साक्ष पूर्ण झाली असून केसरकर यांची उलटतपासणी सुरू झाली आहे. या सुनावणीदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधीपासून भाजपशी युतीची बोलणी सुरू असल्याचे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले होते, असा दावा करण्यात आला होता. त्याच दिशेने आता उदय सामंत यांच्याकडूनही उत्तर देण्यात आले. तर मोदी आणि ठाकरे भेटीत मुंबईत पोहोचल्यावर १५ दिवसांत महाविकास आघाडी सरकार बरखास्त करून युतीची पुनस्र्थापना करण्याचा शब्द नरेंद्र मोदींना ठाकरेंनी दिला होता. सहकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी वेळ लागेल, असा ठाकरेंचा निरोपही मी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्याचे केसरकर आपल्या साक्षीत म्हणाले. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नव्हते, मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते चिरंजीव होते म्हणून आणि आदर होता म्हणून त्यांना पक्षप्रमुख म्हटले जात असे; परंतु पक्षाच्या १९९९च्या घटनेत पक्षप्रमुख पद नसतानाही त्यांना पक्षप्रमुख म्हणत होतो, असा दावा  सामंत आणि दीपक केसरकर यांनी केला.

हेही वाचा >>> “अजित पवारांना मुख्यमंत्री करा, मी पाठिंबा देतो अन्…”, भास्कर जाधवांचं भाजपाला आव्हान

‘ठाकरे यांच्या आश्वासनानंतर मंत्रीपदाची शपथ’ नाराज होतात तर मविआमध्ये दोन वर्षे मंत्री कसे झालात, या प्रश्नावर सामंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा काही कालावधीनंतर भाजपला  घेऊनच सरकार स्थापन केले जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले होते, असा दावा मंत्री सामंत यांनी केला. ठाकरे यांच्या या आश्वासनानंतरच महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्याचा दावा सामंत यांनी केला. २१ जून रोजी वर्षां निवासस्थानी झालेल्या बैठकीला हजर असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र सुनील प्रभू यांचा पक्षादेश (व्हीप) मिळाला नसल्याचेही नमूद केले. निवडणूक लढविण्यासाठीच्या एबी फॉर्मवर कुणाच्या सह्या होत्या यावर त्या सह्या पाहिल्या नाहीत. पक्षावर विश्वास ठेवून फॉर्म घेतल्याचा दावा त्यांनी केला.