दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
जाबजबाबासाठी हरिसालच्या कर्मचाऱ्यांना परतवाड्यात पाचारण
नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबलप्रमुख) यांनी चौकशी समिती गठित के ली. या समितीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. पण, सुरुवातीलाच समितीने उचललेले पाऊल निष्पक्ष चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरले आहे.
वनबलप्रमुखांनी गठीत केलेल्या समितीच्या तीन उपसमित्या करण्यात आल्या आहेत. माजी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्याकडून दीपालीला कशाप्रकारे त्रास सहन करावा लागला, त्यांनी तिच्याशी कशी गैरवर्तणूक के ली, दीपाली सोबत तिच्या कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्तणूक कशी होती, विनोदशिवकु मार यांनी तिला किती प्रकरणात कारणे दाखवा नोटीस दिली, तिला कोणती नियमबाह््य कामे करण्यास भाग पाडले, असे चौकशीचे १५ विषय आहेत.
यातील प्रत्येकी पाच विषय या तिन्ही उपसमितीने वाटून घेतले असून त्या त्या मुद्यावर समिती काम करणार आहे.
त्यातील प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के . राव यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय वनाधिकारी पीयूषा जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी कोकाटे यांचा समावेश असलेली उपसमिती उद्या, रविवारी मेळघाटात चौकशीसाठी जात आहे. मात्र, या समितीने हरिसाल येथे जाऊन चौकशी करण्याऐवजी तिथल्याच काही मोजक्या कर्मचाऱ्यांना परतवाडा येथे बोलावून घेतले आहे. त्यामुळे समितीच्या मूळ उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
समितीने निष्पक्ष चौकशी करण्यासाठी हरिसाल येथे जाणे अपेक्षित होते. ते न करता परतवाडा येथे वनकर्मचाऱ्यांना बोलावण्यामागील गमक काय, हे कळायला मार्ग नाही.
दुसरी उपसमिती मात्र अमरावती आणि हरिसाल येथे जाणार आहे. या उपसमितीत मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वनविकास महामंडळाच्या मुख्य महाव्यवस्थापक मीरा त्रिवेदी आणि सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर यांचा समावेश आहे. ही दूसरी उपसमिती तरी निष्पक्ष चौकशी करणार का, हाही प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
इंग्रजीच्या प्राध्यापिके चे समितीत काम काय?
प्रधान मुख्य वनसंरक्षक(वनबलप्रमुख) यांनी नियुक्त के लेल्या मुख्य समितीत पाच भारतीय वनसेवेतील अधिकारी, दोन कनिष्ठ अधिकारी, एक सेवानिवृत्त अधिकारी आणि एका इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिके चा समावेश आहे. यात त्रयस्थ म्हणून बाहेरची व्यक्ती घेताना इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिके चे या चौकशी समितीत काय काम, हे कळायला मार्ग नाही. समितीत त्रयस्थ कु णीतरी हवे म्हणून तर हा देखावा करण्यात आला नाही ना, अशीही शंका व्यक्त के ली जात आहे.