नागपूर : महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवली जात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतात. शिवसेनेचा वापर सगळीकडे होत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची शिवसेना सध्या कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पक्षवाढीसाठी आधीच प्रयत्न केले असते तर पक्ष कुठल्या कुठे गेला असता. मात्र, आता वेळ निघून गेली असल्याचे मत अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिपाली सय्यद नागपुरात आल्या होत्या. प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गेले. त्यामुळे सगळीकडे केवळ दंगली घडविण्याचे काम केले जात आहे. आपल्याकडील सगळं गेल्यानंतर ती गोष्ट परत कशी मिळणार? मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी घराच्या बाहेर येऊन काम करायला पाहिजे होते. ते जनतेमध्ये जाणे अपेक्षित होते. मात्र ते घराच्या बाहेर पडले नाही. आता निघत आहे. आधी सगळ्यांना पहिले पळवतात आणि मग स्वतः निघतात. तेव्हा जर त्यांनी सातत्य ठेवले असते तर परिस्थिती वेगळी असती, असे दीपाली सय्यद म्हणाल्या.

हेही वाचा – नागपूर: महाराष्ट्रातील वीज दर कमी भासवण्याचा प्रयत्न; महावितरणच्या कारभाराबाबत आक्षेप

हेही वाचा – नागपूर : ‘मार्च एन्ड’चे ‘टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका

महाविकास आघाडी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद दिले आणि बसवून ठेवले. मात्र, त्यावेळी बाहेर काम कोण करत होते. अजित पवार शिवसेनेबद्दल खूप चांगले बोलतात. मात्र, मला एक दिवस म्हणाले की, काम मलाच करावे लागत आहे. शिवसेना काहीच करत नाही. मी राजकारणात सक्रिय आहे. महिला महाराष्ट्र केसरीसाठी मोठा पाठपुरावा केला आणि काल आदेश निघाले याचा आनंद आहे. ६५ वर्षांनंतर आता महाराष्ट्र केसरी महिलांसाठी होत आहे. ही स्पर्धा कोल्हापूरला व्हायला पाहिजे. आपल्या महिला बाहेर जाऊन ऑलिंपिक खेळतात, मात्र महाराष्ट्रात स्थान नाही. त्यामुळे महिलांच्या कुस्तीसाठी पुढाकार घेणार असल्याचे दीपाली सय्यद म्हणाल्या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepali sayyed criticizes uddhav thackeray in nagpur ask where is shiv sena in mahavikas aghadi now vmb 67 ssb
Show comments