लोकसत्ता टीम
गडचिरोली: स्थानिक स्वराज्य संस्था व त्यांनातर होणारी लोकसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन यावेळी गडचिरोली जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. यात अहेरी बाजार समितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती मैदानात उतरली होती . मात्र, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या गटाने दोघानाही मात देत सत्ता काबीज केल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे सत्ताकेंद्र म्हणून राजकीयदृष्ट्या अहेरी विधानसभेला विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद असो की विधानसभा जिल्ह्याचे सूत्र कायम येथूनच हाताळले जातात. त्यात आत्राम राजघराण्याचे वर्चस्व नेहमीच चर्चेत असते.
अशात बाजार समिती निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपचे माजी मंत्री अम्ब्रीश आत्राम यांनी मिळून उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. कायम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे आत्राम काका-पुतणे एकत्र आल्याने ही निवडणूक ते सहज जिंकतील असा कयास देखील बांधला जात होता.
मात्र, आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लाऊन भाजप-राष्ट्रवादी युतीला धोबीपछाड देत ११ जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काही जागा एक ते दोन मतांनी निवडून आल्या. यात धर्मरावबाबा आत्राम यांचे बंधू रवींद्र आत्राम हे कंकडालवार गटाकडून निवडून आले. बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पहिल्यांदाच ताकदीनिशी उतरली होती. तर कंकडालवार गटाकडे पूर्वानुभव गाठीशी होता.
त्यामुळेच कंकडालवार गट सत्ता काबीज करण्यात यशस्वी झाल्याच्या दावा केला जात आहे. तर दुसरीकडे भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.