नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपाचा विरोध नाही, असे खुद्द प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केल्यावरही भाजपाने रविवारी सभेविरुद्ध आंदोलन केले. विशेष म्हणजे, या आंदोलनाची घोषणा करणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आंदोलन स्थळी गैरहजर असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा – सावधान! सायबर लुटारूंनी केलेय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लक्ष्य..
हेही वाचा – लढ्यापूर्वीच ‘वज्रमूठ’ सैल! भाजपा व काँग्रेस आमदार एकाच पंक्तीत
महाविकास आघाडीची येत्या १६ एप्रिलला पूर्व नागपुरात केडीके महाविद्यालयाजवळील दर्शन कॉलनी मैदानात सभा होणार आहे. सभेसाठी मैदान देण्यास भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्यसह पक्षाच्या माजी नगरसेवकानी विरोध कला. रविवारी सकाळी मैदान परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले. मैदान सभेसाठी देणे चुकीचे असून सभेमुळे लोकांना त्रास होणार आहे, त्यामुळे येथील मैदानाची परवनागी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.