नागपूर : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भाजपने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा समावेश करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर फडणवीस आणि गडकरी दिल्ली विधानसभा प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याने ही निवड महाराष्ट्राचे दिल्लीत असलेले स्थान अधोरेखीत करणारी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपने आतापर्यंत ५८ उमेदवारांची घोषणा केली असून अद्याप १२ उमेदवारांची नावे जाहीर होणे बाकी आहे.

हेही वाचा : नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा

त्यानंतर बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री यांचा समावेश आहे.

त्यात महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींना स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १३२ जागा मिळाल्या आहे. महाराष्ट्राच्या या यशामुळे फडणवीस आणि गडकरींचे दिल्लीतील वजन वाढल्याचे हे निदर्शक असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…

‘आप’ला शह देण्यासाठी भाजपाची रणनीती काय?

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघातून भाजपाने मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप यांना उमेदवारी दिली आहे. सध्या भाजपाकडून आक्रमक प्रचार केला जात असला तरी पक्षातील नेते सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत. २०१५ मध्ये भाजपाने शेवटच्या क्षणी माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले होते. त्यावेळी पक्षाला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. यावेळी भाजपाचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

भाजपा प्रचारकांची यादी

नरेंद्र मोदी

जे.पी. नड्डा

राजनाथ सिंह

अमित शाह

नितिन गडकरी

पीयूष गोयल

शिवराज सिंह चौहान

मनोहर लाल खट्टर

धर्मेंद्र प्रधान

हरदीप सिंह पूरी

गिरिराज सिंह

योगी आदित्यनाथ

देवेंद्र फडणवीस

हिमंता विश्व सरमा

मोहन यादव

पुष्कर सिंह धामी

भजनलाल शर्मा

नायब सिंह सैनी

वीरेंद्र सचदेवा

वैजयंती पांडा

अतुल गर्ग

अलका गुर्जर

हर्ष मल्होत्रा

केशव प्रसाद मौर्या

प्रेमचंद बैरवा

सम्राट चौधरी

डॉ. हर्षवर्धन

हंसराज हंस

मनोज तिवारी

रामवीर सिंह बिधुड़ी

योगेंद्र चंडौला

कमलजीत सहरावत

प्रवीण खंडेलवाल

बांसुरी स्वराज

स्मृति ईरानी

अनुराग ठाकुर

हेमा मालिनी

रवि किशन

दिनेश लाल यादव निरहुआ

सरदार राजा इकबाल सिंह