आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शनिवारी नागपुरात पोहचले. फेटरीजवळील माहुरझरी येथील विपश्यना केंद्रात ते ध्यानसाधना करणार आहेत. विमानतळावर केजरीवाल पत्रकारांना म्हणाले, मला वेळ मिळतो तेव्हा मी विपश्यना करतो. सर्वांनीच ती केल्यास चांगला लाभ होतो.  मागच्या वर्षी मी जयपूरला गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नागपूर : मुख्य प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठीच ठाकरे कुटुंबिय लक्ष्य : दानवे; शिवसेनाही (ठाकरे गट) मांडणार सीमावादाबाबतचा ठराव

दरम्यान केजरीवाल यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचलेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी कुठलीही राजकीय चर्चा केली नाही. शनिवारी पक्षाची बैठकही होती. पक्षाचे विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांनी सांगितले की, स्थानिक पदाधिकाऱ्यांना अगोदरच सांगण्यात आले हाेते की, केजरीवाल यांचा अतिशय व्यक्तिगत दौरा आहे. राजकीय चर्चा होणार नाही. पक्षाचे प्रभारी दीपक सिंघला सुद्धा नागपुरातच होते. परंतु केजरीवाल यांनी पक्षासंदर्भात कुठलीही चर्चा केली नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cm arvind kejriwal to go for vipassana session to reduce stress of politics mnb 82 zws