नागपुरातील एकाला यकृतदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : दिल्लीहून उपराजधानीत एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आलेल्या महिलेची प्रकृती अचानक खालावली. उपचारादरम्यान तिचा मेंदूमृत झाल्याचे पुढे आले. कुटुंबीयांनी मोठे मन करत यकृत दानाचा निर्णय घेतला. त्यामुळे महिलेने जगाचा निरोप घेताना येथील एका रुग्णाला जीवदान दिले.

दीप्ती अजय ग्रोवर (४८) रा. दक्षिण दिल्ली असे दानदात्या महिलेचे नाव आहे. दीप्ती यांना पेंटिंगचा छंद होता. त्यांचे पती दिल्लीत सी.ए. असून वडील सैन्यातून कर्नल म्हणून निवृत्त झाले आहेत. वडील नागपुरात राहतात. आपल्या वडिलांची भेट घेण्यासोबतच नातेवाईकाच्या लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी त्या दोन फेब्रुवारीला नागपूरला आल्या. परंतु अचानक ओकारी, भोवळ, असा त्रास सुरू झाला.त्यांना तातडीने एलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनसह विविध तपासणीत ब्रेन हॅम्रेज झाल्याचे पुढे आले.

उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने विविध तपासणीअंती दोन दिवसांनी त्यांचा मेंदूमृत झाल्याचे निदान झाले.

रुग्णालयातील डॉक्टरांसह विभागीय प्रत्यारोपण समितीकडून महिलेच्या नातेवाईकांचे समुपदेशन केले गेले. कुटुंबाने मोठे मन करत यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. तातडीने एलेक्सिस रुग्णालयातील यकृताच्या प्रतीक्षा यादीतील महिलेच्या गुणसूत्राशी साम्य असलेल्या रुग्णाला सूचना दिली गेली.

आज मंगळवारी उशिरापर्यंत चाललेल्या या यकृत प्रत्यारोपणामुळे एकाला जीवदान मिळाले. प्रत्यारोपणाच्या यशस्वीतेसाठी एलेक्सिस    रुग्णालयातील  वैद्यकीय चमूसह विभागीय प्रत्यारोपण    समितीच्या डॉ. विभावरी    दाणी,   डॉ. रवि वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्यां वीणा वाठोरे आणि चमूने प्रयत्न केले.